सोलापूरमध्ये अंधश्रद्धेच्या नावाखाली धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वादग्रस्त भोंदू बाबा मनोहर भोसले याच्याविरुद्ध आर्थिक फसवणूक आणि लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, आरोपीने स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचा दावा करत पीडित महिलेच्या नातेवाईकाचा गंभीर आजार बरा करून देण्याचे आमिष दाखवले. या बहाण्याने महिलेकडून मोठी रक्कम उकळल्याचा आरोप आहे.
त्यानंतर विश्वासाचा गैरफायदा घेत महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. सोलापूरचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी अंधश्रद्धेच्या नावाखाली फसवणूक आणि महिलांचे शोषण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
वादग्रस्त भोंदू बाबा मनोहर भोसले अडचणीत; गंभीर गुन्हा दाखल
