पुणे

कोणाच्याही दबावा मूळे फादर दिब्रीटो यांची  निवड रद्द केल्यास महाराष्ट्रातील संपूर्ण ख्रिश्चन समाज मतदाना वर बहिष्कार टाकेल ; अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आशिष शिंदे यांचा इशारा

पुणे (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन न्युज)
उस्मानाबाद येथे होणाऱ्या ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संभेलनासाठी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या बिनवीरोध व कोणताही वाद न करता निवड करण्यात आली आहे.निवड करणारे जेष्ठ साहित्यिक आहेत परंतु काहीजणांना या निवडीमूळे पोट दुखी झालेली आहे.विशेष म्हणजे साहित्याचा कोणताही गंध नसलेले व स्वतः चे एक ही पुस्तक प्रसिद्ध नसणारे काहीजण या निवडीला जातीय रंग देवू पाहतायत.हे आपल्या परोगामी महाराष्ट्राला शोभणारे नाही.फादरांनी ख्रिस्ता प्रमाणेच, संत तूकाराम,संत ज्ञानेश्वर व पर्यावरण यांच्या वर गाढा अभ्यास व लिखाण केलेले आहे.म्हणून त्यांना आंळदी येथे शासनाने सन्मानीत केलेले आहे.त्यांचे लिखान हे ख्रिस्ती धर्माच्या पलिकडील आहे.ज्यांना माहिती नाही त्यांनी अभ्यास करावा व मग बोलावे.कोणाच्याही दबावा मूळे फादर दिब्रीटो यांची निवड रद्द केल्यास किंवा त्यांना पद सोडण्यास भाग पाडल्यास व त्यांचा अपमान केल्यास  संपूर्ण महाराष्ट्रातील ख्रिश्चन समाज मतदाना वर बहिष्कार टाकेल.असा इशारा ख्रिश्चन समाजाची राज्यव्यापी संघटना अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आशिष शिंदे यांनी दिला आहे.

0 0 votes
Article Rating
332 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments