पुणे

“नवरात्र उत्सवात शासकीय नियमांचे पालन करून मंडळांनी सतर्क रहावे – अतिरिक्त आयुक्त रंजनकुमार शर्मा… “हडपसर पोलीस ठाण्यात नवरात्र उत्सव पूर्वतयारी बैठक संपन्न…

पुणे (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन प्रतिनिधी )
कर्णकर्कश डीजे, लेझर लाईट्स याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहेत, पर्यायाने अनेकांचे मृत्यू झाले आहेत त्यामुळे सार्वजनिक उत्सवात याचा अतिरेक टाळले पाहिजे, इस्राईल हमास युद्ध होत त्यामुळे जागतिक वातावरण बिघडले आहे, गर्दीच्या ठिकाणी अतिरेकी संभाव्य कारवाया लक्षात घेऊन नवरात्र उत्सवात स्वयंसेवक नेमावे, सीसीटीव्ही लावावेत, सोशल मीडिया वर चुकीचे मेसेज शेअर केले जाऊ नयेत मिरवणुकी धोकादायक पद्धतीने काढू नयेत असे आवाहन पुणे अतिरिक्त पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी केले.

हडपसर पोलीस स्टेशन मध्ये नवरात्र उत्सव पूर्वतयारी बैठक आयोजित करण्यात आली होती, यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते,
याप्रसंगी अतिरिक्त पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा, उपायुक्त विक्रांत देशमुख, सहाय्यक पोलीस आयुक्त अश्वीनी राख, महापालिका हडपसर सहाय्यक आयुक्त बाळासाहेब ढवळे पाटील, हडपसरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र शेळके, लोणी काळभोरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण, मुंढवा वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे, हडपसर वाहतूक पोलीस निरीक्षक उल्हास कदम, मुंढवा वाहतूक विभागाचे पो.नि. धनंजय पिंगळे, हडपसर गुन्हेचे विश्वास डगळे, संदीप शिवले, एलआयबीचे दिनेश शिंदे, उमेश शेलार, आदींसह हडपसर परिसरातील नवरात्र मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नुकत्याच झालेल्या गणेशोत्सव मध्ये डीजेचा वापर मोठ्या प्रमाणात झाला त्यामध्ये मृत्यू झाले, लेजर लाईट्स चा डोळ्यावर विपरीत परिणाम झाला हे लक्षात घेऊन सार्वजनिक मंडळांनी शासनाच्या नियमांचे पालन करावे उत्सवात केलेला अतिरेक मानवी आयुष्यासाठी घटक आहे, असे मत पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख यांनी व्यक्त केले.
नवरात्र उत्सव खास महिलांचा उत्सव असतो महिला मोठ्या प्रमाणात यामध्ये सहभागी होत असतात उत्सवात महिलांची सुरक्षा महत्वाची आहे अनुचित घटना घडू नये म्हणून पोलीस सतर्क आहेतच पण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सर्वतोपरी दक्षता घ्यावी असे आवाहन सहायक पोलीस आयुक्त अश्विनी राख यांनी केले.
प्रास्ताविक भाषणात वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र शेळके यांनी नवरात्र उत्सव साजरा करताना घ्यावयाची काळजी व नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले.

हडपसर मधील वाहतूक व्यवस्था सुरळीत रहावी म्हणून वाहतूक पोलिसांच्या वतीने उपाययोजना करण्यात येतील असे हडपसर वाहतूक पोलीस निरीक्षक उल्हास कदम यांनी सांगितले.
माजी नगरसेवक मारुती तुपे, योगेश ससाणे, पंडित नेहरू भाजीपाला व्यापारी संघटना नवरात्र उत्सव अध्यक्ष हेमंत ढमढेरे, कार्याध्यक्ष अनिल मोरे, लोककल्याण प्रतिष्ठान अध्यक्ष राजाभाऊ होले, माजी उपसरपंच अमित आबा घुले, सागर तुपे यांनी यावेळी नवरात्र उत्सवात येणाऱ्या अडचणी मांडल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सूचना ऐकून घेऊन त्यावर उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.