पुणेमहाराष्ट्र

पुणे गॅस सिलेंडर च्या स्फोटांनी हादरले ; एकामागोमाग 9 गॅस स्फोट, नागरिक भीतीने घराबाहेर, तीन बस जळून खाक…!

पुणे : प्रतिनिधी : रमेश निकाळजे

पुणे : पुण्यातील पिंपरी चिंचवड मधील ताथवडे भागात रविवारी स्फोट झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेत शाळेच्या तीन बस जळल्या आहे. या घटनेच तब्बल 9 गॅस टाक्यांचा स्फोट झाला आहे. धक्कादायक म्हणजे ही घटना गॅस चोरीचा काळाबाजार करत असताना ही घटना घडली असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. अचानक झालेल्या या लागोपाठ स्फोटांनी परिसरातील नागरिकांचा फार गोंधळ उडाला. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र जवळच असणाऱ्या शाळेतील तीन वाहनाना आग लागून जळून खाक झाली आहेत. रविवारी रात्री साडे अकराच्या सुमारास स्फोट होऊन आग लागली.

ताथवडे परिसरात गॅस टाकीचा काळाबाजार करत असताना, अचानक गॅसचा स्फोट झाला. या भीषण आगीत शाळेतील तीन बस आगीत जळून खाक झाल्या. एकामागोमाग एक स्फोट झाल्याने परिसरातील नागरिकांचा फार गोंधळ उडाला. नागरिकांनी घराबाहेर धाव घेतली. त्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते तसेच ट्राफिकही जाम झाले होते.

आगीचा स्फोट पाहून काळाबाजार करणाऱ्यांनी देखील घटनास्थळावरून पळ काढला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच, पोलिस आणि अग्निशमन दालाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. भीषण आग एका ते दीड तासांनंतर आटोक्यात आली. आगीचे कारण सध्या अस्पष्ट असले तरी आग ही गॅस चा काळाबाजार करताना लागली असे पोलिसांनी सांगितले आहे. कारण त्याठिकाणी गॅस टँकर आढळून आला आहे. व त्याचा चालक आणि गॅस चोरटे फरार झाले आहेत. त्यांचा शोध वाकड पोलिसांकडून सुरु आहे.