पुणे

वाहनचोरी करायचीअन मौजमजा करणारे आरोपी गजाआड, १४ वाहने जप्त : हडपसर तपास पथक आणि दरोडा – वाहनचोरी विरोधी पथक-२ ची कामगिरी

वाहनचोरीच्या वाढत्या घटनांना रोखण्यासाठी पुणे पोलिसांकडून व्यापक उपाय योजना करण्यात येत आहेत. एका कारवाईत मोजमजेकरिता दुचाकी चोरी करणाऱ्या चोरट्याला गुन्हे शाखा वाहनचोरी व दरोडा विरोधी पथक तसेच हडपसर पोलीसांकडून ताब्यात घेण्यात आले आहे. यावेळी तब्बल १४ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. पोलीस आयुक्त पुणे शहर यांनी पुणे शहरात वाहन चोरीच्या गुन्ह्याचे प्रमाण यादत असल्याने, त्याबाबत कारवाई करण्याबाबत गुन्हे शाखेला व सर्व पोलीस स्टेशन यांना सुचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-२ (युनिट-२), गुन्हे शाखा पुणे शहर यांनी आरोपी नामे मुजफ्फर ऊर्फ सलमान रफिक पठाण वय २६ वर्ष, भोसरी पुणे यास ताब्यात घेवून त्याचेकडून पुणे शहरातील ८ वाहनचोरीचे गुन्हे उघड केले होते.

 

आरोपी नामे मुजफ्फर ऊर्फ सलमान रफिक पठाण वय २६ वर्ष यास हडपसर तपास पथकाने, हडपसर पोलीस ठाणे गु.र.नं १३७४/२०२३ भा.दं.वि. कलम ३७९ या गुन्ह्यात वर्ग करून घेवून त्याच्याकडे तपास पथक अधिकारी सपोनि विनयकुमार शिंदे, पोउपनिरी अविनाश शिंदे, पोलीस अंमलदार सुशील लोणकर, शहीद शेख, प्रशांत दुधाळ, निखील पवार, अतुल पंधरकर, भगवान हंबडे, अनिरुध्द सोनवणे, अमित मदने, चंद्रकांत रेजितवाड असे तपास करीत असताना आरोपी याने आणखी ०६ वाहनचोरीचे गुन्ह्यांची कबुली दिली.

हडपसर तपास पथकाने आरोपीकडून आजपर्यंत एकूण ०६ गुन्हे केले असून रू २,८०,०००/- चा माल जप्त केला आहे. त्यामध्ये १ होंडा युनिकॉर्न, ०२ बजाज पल्सर, ०२ स्प्लेन्डर, ०२ ग्लैमर, ०१ होंडा शाईन, आणी ०१ ड्रीम बुगा अशा ०६ दुचाकी जप्त करण्यात आल्या. उघडकीस आलेले गुन्हे आणि पो.स्टे पुढीलप्रमाणे, हडपसर पोलीस ठाणे ०२, लोणीकाळभोर पोलीस ठाणे ०२. वाकड पोलीस ठाणे ०१, पिंपरी पोलीस ठाणे ०१ असे एकूण ०६ गुन्हे उघडकीस आलेले आहेत.

आरोपी हा वाहनचोरी करताना बसने घरातुन निघत असे, तसेच वाहनचोरी केल्यानंतर त्याच वाहनावर बसून
निघून जात जाताना सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसेल ही शक्यता गृहीत धरून तो अंगावर ८ ते १० वेगवेगळ्या रंगाचे शर्ट घालत असे जेणेकरून त्याचा सीसीटीव्ही आधारे शोध घेताना अडथळे निर्माण होतील.

सदरची कामगिरी ही रितेश कुमार पोलीस आयुक्त पुणे शहर, संदिप कर्णिक सह पोलीस आयुक्त, पुणे शहर, रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग व विक्रांत देशमुख, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५ यांचे मार्गदर्शनाखाली अश्विनी राख, सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे रविंद शेळके वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर, विश्वास डगळे, पोनि (गुन्हे), संदीप शिवले पोनि.(गुन्हे) यांचे सुचनाप्रमाणे तपास पथकाचे सहा पोलीस निरीक्षक, विजयकुमार शिंदे, पोलीस उप निरीक्षक अविनाश शिंदे, पोलीस अंमलदार, पोलीस अंमलदार, सुशील लोणकर, शाहीद शेख, प्रशांत दुधाळ, निखील पवार, अतुल पंधरकर भगवान हंबर्डे, अनिरूध्द सोनवणे, अजित मदने, चंद्रकांत रजीतवाड, सचिन गोरखे, यांचे पथकाने करून प्रशंसनीय कामगिरी केली आहे.