पुणे (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन):
वानवडी पोलिस स्टेशनच्या हद्दीत वाहनचोरी करणारे विनायक साकोरे (वय १९, रा. देहूरोड), समीर तडवी (वय १९, रा. लोणी काळभोर) यांना पोलिसांनी जेरबंद केलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सहाय्यक पोलिस निरीक्षक शेटे, सहाय्यक फौजदार प्रदिप गुरव, हवालदार दत्तात्रय तेलंगे, पोलिस नाईक ज्ञानेश्वर गिरमकर, शिपाई शिरीष गोसावी गणेश खरात हे वाहन चोरीच्या अनुषंगाने पेट्रोलिंग करत असताना प्रदीप गुरव, ज्ञानेश्वर गिरमकर व शिरीष गोसावी याना जगताप चौकाकडे दोन संशयित इसम मोटर सायकलवरून जोरात जात असल्याची माहिती मिळाली.
त्यावरून त्याना अडवले असता ते पळून जाऊ लागले. सिक्रेट सिटी हार्ट, टाऊन सोसायटीजवळ दोघांना पकडून त्यांची चौकशी केली असता त्यांच्याजवळील मोटरसायकलची चौकशी केली असता सदर पल्सर २२० ४५ हजार रूपये नंबर एमएच १४ सीटी २७६७ चोरीची असल्याचे सांगितले. त्याचा साथीदार तडवीकडे एक गावठी कट्टा व १ जिवंत काडतुस किंमत २५,२००/- असा एकूण ७०,२०० रूपयाचा माल जप्त करण्यात आला आहे.
सदर कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.
Hiya, I’m really glad I have found this info. Nowadays bloggers publish only about gossips and web and this is really frustrating. A good website with exciting content, this is what I need. Thank you for keeping this website, I’ll be visiting it. Do you do newsletters? Can not find it.
Great write-up, I am regular visitor of one’s website, maintain up the nice operate, and It is going to be a regular visitor for a long time.