पुणे

व्हिजन हडपसर…. एक सकारात्मक दृष्टिकोन नागरिक व प्रशासनामध्ये दुवा म्हणून काम करणार ; हडपसर मतदारसंघात विकासासाठी आता जनता रस्स्त्यावर

हडपसर /पुणे (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन)
शेतकरी व कष्टकरी वर्गाची हडपसर आता पुणे शहरातील आघाडीची आयटी पार्क बनले आहे मोठ्या टाउनशिप साकारत असताना येथील सर्वसामान्य व मध्यमवर्गीयांना मूलभूत आणि पायाभूत सुविधांपासून वंचित रहावे लागत आहे नागरिकांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचावा व येथील नागरी प्रश्न सोडविण्यासाठी नागरिक व प्रशासन यांच्यातील दुवा म्हणून हडपसरच्या युवकांनी व्हिजन हडपसर या संस्थेची स्थापना केली.
सकारात्मक दृष्टीने हडपसरच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय ठेवून पुणे स्मार्ट सिटी बनत असताना हडपसर उपनगर स्मार्ट व्हावे याकरिता नागरिकांचा सहभाग यामध्ये असावा या उदात्त हेतूने ही संस्था कार्यरत राहणार आहे हडपसर चा पूर्व इतिहास अभ्यासताना जाणवते येथे शिवाजी महाराजांचे मावळे, इंग्रज तसेच व्यापाऱ्यांचा फार वर्षापूर्वी वावर होता हडपसरची जमीन इतकी सुपीक होती की येथे शंभर वर्षांपूर्वी इंग्लिश वाण पिकवले जात होते व ते निर्यात केले जात असत कालांतराने नागरीकरण वाढले, सिमेंटच्या जंगलात शेती नष्ट झाली व तेथे मोठे आयटी पार्क उभारले एकीकडे समृद्ध विकास झालेला दिसत असताना दुसरीकडे मात्र बकालपण आलेला दिसतो.
पायाभूत व मूलभूत सुविधा सक्षम नसल्याने येथील नागरिक व वाहनचालकांना अनेक समस्यांचा सामना दैनंदिन जीवनात करावा लागत आहे येथील वाहतूक कोंडी, झोपडपट्ट्या, अपुऱ्या नागरी सुविधा, वाहनतळ नसल्याने वाहनचालकांची कसरत, बेकायदेशीर वाहतूक प्रवास, सार्वजनिक सुविधांचा अभाव, अतिक्रमणे या एक ना अनेक समस्यांना तोंड देताना नागरिक हतबल झालेले जाणवतात पूर्व पुण्यात नागरी सुविधा व सर्व पक्षांनी केलेला विकास लक्षात घेता पूर्व विभागात असलेले हडपसर अजूनही मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करताना दिसते.
राजकीय पक्षांनी ठरवले तर हडपसर विकासाचे नंदनवन होऊ शकते, नागरिक आपले प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी राजकीय नेत्यांकडे आशेने पाहतात पण त्यांच्या सर्व समस्या सुटत नाहीत आता नागरिक सुज्ञ व सुजाण झालेले असल्याने प्रशासनाकडून काम करून घेण्याची ऊर्जा त्यांच्यामध्ये आहे नागरिकांचा आवाज व गाऱ्हाणे प्रशासकीय अधिकाऱ्यांना पर्यंत पोहोचावे या हेतूने हडपसर मधील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या युवकांनी आता “व्हिजन हडपसर” या संस्थेची स्थापना केली आहे सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, इंटरनेट मीडिया, चॅनल मीडियाच्या माध्यमातून जनतेचा आवाज प्रशासनापर्यंत जावा आणि येथील नागरिक प्रश्न सुटून स्मार्ट हडपसर साठी विविध प्रकल्प यावेत हा शुद्ध हेतू या संस्थेचा आहे, कोणत्याही राजकीय पक्षाशी बांधिलकी न ठेवता हडपसरमधील विकासकामात सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संस्था, सामाजिक कार्यकर्ते, संघटना व मंडळांना सोबत घेऊन एक सकारात्मक चळवळ उभा करण्याचा मनोदय युवकांनी पहिल्याच बैठकीत बोलताना व्यक्त केला.
पुणे शहर स्मार्ट होत असताना हडपसर उपनगर स्मार्ट उपनगर कसे व्हावे याकरिता युवकांनी “व्हिजन हडपसर” हे खुले व्यासपीठ सर्वांसाठी निर्माण केले आहे सर्वांनी या विकासाच्या चळवळींमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन व्हिजन हडपसरच्या सदस्यांनी केले आहे.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
2 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
5 years ago

You can definitely see your enthusiasm in the work you write. The world hopes for even more passionate writers like you who are not afraid to say how they believe. Always follow your heart. “If the grass is greener in the other fellow’s yard – let him worry about cutting it.” by Fred Allen.

5 years ago

It’s really a great and useful piece of information. I’m satisfied that you just shared this helpful information with us. Please keep us up to date like this. Thanks for sharing.

Comment here

2
0
Would love your thoughts, please comment.x
()
x