पुणे

आजारास कंटाळून वृद्धाची आत्महत्या

लोणी काळभोर दि 21( वार्ताहर – रोखठोक महाराष्ट्र न्युज – )

आजारास कंटाळून एकाने वृद्धाश्रमाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. विलास फुलचंद कासली वाला (वय 65 सध्या रा. वाघोली; मूळ रा. उत्तमनगर सिडको नाशिक) त्याचे नाव आहे. कासलीवाल यांना डिमेन्शियाचा आजार असल्याने ते आपली मुलगी राधिका संदीप गंगावाल तिच्याकडे वाघोली येथे राहत होते. काही दिवसांपासून त्यांना उपचारासाठी समर्पण वृद्धाश्रम सिद्धिविनायक नगर लोणी काळभोर येथे ठेवण्यात आले होते बुधवारी( दि. 20) दुपारी साडेतीनच्या सुमारास त्यांनी तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली