पुणे

पुण्यात 42 कोटींचा घोटाळा! 2000 गुंतवणूकदारांची फसवणूक |

पुण्यात मोठा आर्थिक घोटाळा उघडकीस आला आहे. गुंतवणुकीवर जास्त परताव्याचे आमिष दाखवून तब्बल ४२ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप खासगी कंपनीच्या संचालकांवर करण्यात आला आहे.
या प्रकरणी संतोष बांदल आणि ज्ञानेश्वर चोरगे यांच्याविरोधात आर्थिक गुन्हे शाखेकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्वे रस्त्यावरील कार्यालयासह सॅलिसबरी पार्क आणि बिबवेवाडी येथील त्यांच्या निवासस्थानी छापे टाकण्यात आले.

जुलै २०२२ ते एप्रिल २०२६ या कालावधीत या कंपनीने गुंतवणूकदारांना आकर्षक परताव्याचे आमिष दाखवत पैसे गोळा केले. सुरुवातीला काहींना परतावा देऊन विश्वास निर्माण केला, मात्र नंतर अचानक पैसे देणे बंद केले.
प्राथमिक तपासात तब्बल २ हजार गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू असून, आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.