पुणे

उन्हात BP लो झाल्यास काय कराल? डॉक्टरांनी सांगितला सोपा उपाय

उन्हाचा पारा ४५ अंशांच्या पुढे गेला आहे… आणि या कडक उन्हामुळे आता “लो ब्लडप्रेशर”ची समस्या झपाट्याने वाढताना दिसत आहे.
डॉक्टरांच्या मते, उन्हाळ्यात सतत घाम आल्यामुळे शरीरातील पाणी आणि इलेक्ट्रोलाइट्स कमी होतात. त्यामुळे अचानक चक्कर येणे, डोळ्यांसमोर अंधारी येणे, अशक्तपणा किंवा बेशुद्ध पडण्याचा धोका वाढतो.
जर एखाद्याचा BP अचानक लो झाला… म्हणजेच ९०/६० पेक्षा कमी आला… तर घाबरू नका.
सर्वात आधी त्या व्यक्तीला सावलीत किंवा थंड जागी झोपवा… आणि त्याचे पाय थोडे वर करा. त्यामुळे मेंदूकडे रक्तपुरवठा सुधारतो.
यानंतर डॉक्टरांनी सांगितलेला सोपा उपाय म्हणजे — लिंबूपाण्यात चिमूटभर मीठ टाकून द्या. यामुळे शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सची कमतरता भरून निघण्यास मदत होते.
त्यासोबत ORS द्रावण दिल्यासही पटकन आराम मिळू शकतो.
पण लक्षात ठेवा… अशा वेळी व्यक्तीला अचानक उभं करू नका. आणि श्वास वेगाने चालत असेल किंवा व्यक्ती बेशुद्ध पडली असेल… तर तात्काळ डॉक्टरांकडे घेऊन जा.
उन्हाळ्यात भरपूर पाणी प्या… उपाशी राहू नका… आणि शरीराला डिहायड्रेशनपासून वाचवा.