हवेली

तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत कन्या प्रशाला लोणी काळभोर चा द्वितीय क्रमांक.

हवेली प्रतिनिधी:-अमन शेख

नूतन माध्यमिक विद्यालय, वडकी. ता. हवेली येथे तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते २६ नोव्हेंबर – मुली तालुका क्रीडा कार्यालयातर्फे झालेल्या स्पर्धेत १७ वर्षांखालील मुलींच्या खो-खो स्पर्धेत लोणी काळभोर कन्या प्रशाला या शाळेने द्वितीय क्रमांक पटकवीला आहे. वडकी येथे ही स्पर्धा झाली. या स्पर्धेत १० संघांनी सहभाग नोंदवला होता गेल्या दोन वर्षांपासून कोरोणा महामारी मुळे शाळा, महाविद्यालय बंद होती.लोणी काळभोर कन्या प्रशाला ग्राउंड ची अवस्था देखील दयनीय होती या अडचणीवर मात करून यावेळी विजेतेपद पटकावले.

लोणी काळभोर कन्या प्रशाला विद्यालयाने सुभद्राबाई माध्यमिक विद्यालय लोणीकंद विरुद्ध सेमी फायनल लोणी काळभोर दोन गुणांनी कन्या प्रशाला विजयी झाली.सुभद्राबाई माध्यमिक विद्यालय लोणीकंद विद्यालयाचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात फायनल मध्ये पवार पब्लिक स्कूल हडपसर विरुद्ध कन्या प्रशाला फायनल द्वितीय क्रमांक मिळाला.
खो – खो क्रीडा स्पर्धेत. १७ वर्ष वयोगट मुली. हवेली तालुक्यात द्वितीय क्रमांक मिळवून कन्याप्रशाला लोणी काळभोरचे तालुक्यात नावलौकिक केले. यावेळी कर्तव्यदक्ष मुख्याध्यापिका निशा झिंजुरके यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले. तसेच सर्व शिक्षक, सेवकवृंद, क्रीडा शिक्षक सूर्यवंशी आणि तंत्रस्नेही शिक्षक गोरे यांनी वेळोवेळी ऑनलाईन चे काम पूर्ण करून सहकार्य केले,या सर्वांच्या सहकार्यामुळे. संघ विजय होऊ
शकला. विजयी संघावर परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे .