Ashok Kharat Case: SIT चा मोठा खुलासा! आता कोणावर कारवाई होणार?

Rokhthok Maharashtra 17 0

नाशिकमधील गाजत असलेल्या Ashok Kharat प्रकरणात मोठा अपडेट समोर आला आहे…
SIT प्रमुख IPS अधिकारी Tejaswi Satpute यांनी पहिल्यांदाच तपासाबाबत मोठे खुलासे केले आहेत.
आतापर्यंत या प्रकरणात 12 गुन्हे दाखल झाले असून…
त्यापैकी 9 गुन्ह्यांचा तपास SIT करत आहे.
यामध्ये 8 गुन्हे महिलांच्या लैंगिक शोषणाशी संबंधित…
तर 1 गुन्हा फसवणुकीचा आहे.

https://www.instagram.com/rokhthokmaharashtra/reel/DW3X5pZIEMi/

तपासात 30 हून अधिक साक्षीदारांची चौकशी झाली आहे…
आणि अजूनही तपास सुरूच आहे.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे—
फोटो, व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या राजकीय आणि इतर व्यक्तींचीही चौकशी होणार का?
यावर सातपुते म्हणाल्या—
“पुरावे समोर आले तर कोणालाही सोडणार नाही!”
तसेच, या गुन्ह्यामागे कोणाची ‘इकोसिस्टीम’ आहे का…
याचाही तपास सुरू आहे.
श्रद्धेचा गैरफायदा घेऊन भीती दाखवणे, पैसा उकळणे
आणि महिलांचे शोषण—हे सर्व तपासात समोर आले आहे.
आता पुढील 40 ते 45 दिवसांत आरोपपत्र दाखल होणार आहे…
आणि या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे!

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.