चालू असलेले भांडण मिटवल्यामुळे लॉज व्यवस्थापकावर च जीवघेणा हल्ला ;दोघांना अटक

Rokhthok Maharashtra 15 0

पुणे :प्रतिनिधी ( रमेश निकाळजे ); हडपसर मधील गंगानगर भागात लॉजमध्ये दोन गटात चालू असलेले भांडण मिटविल्याच्या रागातून टोळक्याने व्यवस्थापकावरच कोयत्याने वार करण्याचा प्रकार घडला आहे.

याप्रकरणी अक्षय अरूण गोरे ( रा. गंगानगर, हडपसर) याच्यासह त्याच्या दोन साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. व्यवस्थापक प्रकाश पनिका (वय २९) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

प्रकाश हे गंगानगर येथील विजय ओयो लॉजचे व्यवस्थापक असून दोन दिवसांपुर्वी अक्षय व त्याचे दोन मित्र तेथे आरामासाठी आले होते. त्यांच्या रूमशेजारी मोठ्या आवाजात गाणी लावण्यात आली होती. त्याचा त्रास होऊ लागल्याच्या कारणावरून तिघांनी ग्राहकासोबत वादावादी करत् असताना व्यस्थापक मध्ये आल्यामुळे भांडण मिटवले गेले

त्याचा राग आल्यामुळे दुसऱ्या दिवशी अक्षयने त्याच्या साथीदारांसह प्रकाश यांना शिवीगाळ केली. दोघांवरही कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न केला. हवेत कोयते फिरवून दहशत माजवित अक्षयने “मी फुरंसूंगीचा भाई आहे, बाहेरून येऊन माझ्यावर हात टाकता का, तुझी विकेटच काढतो” असे म्हणत धमकी दिली. याप्रकरणी भेकराई पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक सौरभ माने पुढील तपास करीत आहेत.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.