रोटरी क्लब ऑफ गांधी भवनच्या वतीने कोथरूड शॉपिंग फेस्ट चे आयोजन

Rokhthok Maharashtra 19 0

– २७ आणि २८ मे २०२३ रोजी महिला नव उद्योजिका, सेवाभावी संस्थांना मिळणार व्यासपीठ

पुणे : रोटरी क्लब ऑफ गांधी भवनच्या वतीने कोथरूड शॉपिंग फेस्ट सीजन २ चे आयोजन करण्यात आले आहे.  २७ आणि २८ मे २०२३ रोजी होणाऱ्या या शॉपिंग फेस्ट सीजन २ मध्ये रोटरी क्लबने सामाजिक दायितवाच्या जाणिवेतून महिला नव उद्योजिका आणि सेवाभावी संस्था यांना व्यावसायिक व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याची माहिती रोटरियन डॉ. ऋचा वझे – मोकाशी यांनी दिली. तसेच यावेळी महासंचालक डॉ.अनिल परमार हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

हा उपक्रम डॉ ऋचा वझे – मोकाशी यांच्या पुढाकाराने होत आहे. तर यामध्ये रोटरी क्लब ऑफ गांधी भवनचे अध्यक्ष रोटरियन पद्मजा जोशी, सचिव रोटरियन अश्विनी शिलेदार, पुष्कर मोकाशी, शशांक टिळक, मनीष धोत्रे, दीपा पुजारी, प्रसाद पुजारी यांचा सहभाग असणार आहे. 

कोथरूड शॉपिंग फेस्ट सीजन २ बद्दल अधिक माहिती देताना डॉ. ऋचा वझे – मोकाशी म्हणाल्या, सामाजिक कार्याला हातभार लावण्याच्या हेतूने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या शॉपिंग फेस्ट चे उद्घाटन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते २७ मे रोजी सकाळी १० वाजता गांधी भवन कोथरूड येथे होणार आहे. दोन दिवस चालणाऱ्या या शॉपिंग फेस्ट मध्ये ८० हून अधिक महिला नव उद्योजिका सहभाग घेणार आहेत.  महिला उद्योजिकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा आमचा हेतु आहे यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी या उपक्रमाला पाठिंबा देण्यासाठी शॉपिंग फेस्ट ला भेट द्यावी असे आवाहन त्यांनी केले.

रोटरी क्लब गांधी भवन मागील २२ वर्षांपासून कार्यरत असून या काळात क्लबने विविध सामाजिक कार्यात सहभाग नोंदवला आहे. या उपक्रमाचे सुवर्ण प्रायोजक गंगोत्री हॉलिडे आणि होम्स,इव्हेंट प्रायोजक वासू इव्हेंट्स तर पावर्ड बाय क्रिस्टल किया आणि खादी वर्ल्ड आहेत.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.