रत्नागिरीत दोन ST बसची भीषण धडक; २२ जखमी!

Rokhthok Maharashtra 7 0

रत्नागिरी शहराजवळील भाट्ये येथे दोन एसटी बसची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातात शालेय विद्यार्थ्यांसह तब्बल २२ जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका एसटी बसने क्रेटा कारला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. याचवेळी बसचा ताबा सुटल्याने समोरून येणाऱ्या दुसऱ्या एसटी बसला जोरदार धडक बसली.
अपघातग्रस्त बसपैकी एक बस आंबोळगडहून रत्नागिरीच्या दिशेने येत होती. या बसमध्ये मोठ्या संख्येने शालेय विद्यार्थी प्रवास करत होते.
धडक इतकी भीषण होती की बसमधील अनेक प्रवासी जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच भाट्ये परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि जखमी विद्यार्थी व प्रवाशांना बसमधून बाहेर काढले.
जखमींना उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, या अपघातात क्रेटा कारचंही मोठं नुकसान झालं असून, कारमधील सर्वजण सुखरूप असल्याची माहिती आहे.
अपघाताचं नेमकं कारण आणि जखमींची प्रकृती याबाबत अधिक माहिती मिळवण्याचं काम सुरू आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.