पुणे जिल्हा हददीतुन तडीपार केलेल्या सराईत गुन्हेगारास लोणी काळभोर पोलिसांनी केले अटक

Rokhthok Maharashtra 14 0

हवेली तालुका प्रतिनिधी:-अमन शेख

लोणी काळभोर पोलीस ठाणे हददीतील मा.पोलीस उप आयुक्त, परि-५ याचे आदेशान्वये ऑगस्ट २०२१ पासुन ०२ वर्षाकरिता पुणे जिल्हा हददीतुन तडीपार करण्यात आलेला रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार प्रणव भारत शिरसाट, वय-२१ वर्षे, रा.आंग्रे वस्ती. लोणी काळभोर, ता. हवेली, जि.पुणे हा त्यास पुणे जिल्हा हददीतुन तडीपार केलेले असताना देखील लोणी काळभोर पोलीस ठाणे हददीत फिरत असलेबाबत बातमी मिळाली असता सदरचे माहितीवरुन मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेन्द्र मोकाशी यांनी तपास पथकाचे अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक राजु महानोर व अंमलदार याना कारवाई करण्याबाबत सुचना दिल्या असता नमुद पथकाने तडीपार सराईत गुन्हेगार यास लोणी काळभोर गावचे हददीतुन पाठलाग करून त्यास ताब्यात घेवून त्याच्या विरुध्द मुंबई पोलीस कायदा कलम १४२ प्रमाणे गुन्हा दाखल करून अटक करण्यात आले आहे.

सदरची उल्लेखनीय कामगिरी श्री. राजेन्द्र मोकाशी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लोणी काळभोर पोलीस ठाणे, पुणे शहर यांचे मार्गदर्शनानुसार तपास पथकातील अधिकारी सपोनि/राजु महानोर व अंमलदार पो. हवा / संतोष होले, पो. शि/ राजेश दराडे यांनी केलेली आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.