किरकोळ वादातून टोळक्याने केला तरुणावर कोयत्याने वार

Rokhthok Maharashtra 1 0

प्रतिनिधी: स्वप्नील कदम

लोणी काळभोर: किरकोळ वादातून टोळक्याने तरुणावर कोयत्याने वार करून परिसरातील नागरिकानमध्ये दहशत माजविली. ही घटना (ता.11) रात्री नऊ च्य् सुमारास मांजरी बुद्रूक परिसरात घडली. गौरव नेटके असे जख्मी झालेल्यांचे नाव आहे.

अक्षय शंकर कोलकर (वय 24 ) , राकेश देविदास थोरात ( वय 20) , मंगेश देविदास थोरात ( वय 22) , प्रदीप गल्लापा महिर (२४), शंतनु संतोष गायकवाड ( वय 20) सर्व रा. मांजरी बुद्रूक अशी त्यांची नावे आहेत. या प्रकरणी हडपसर पोलीसांनी या पाच जणांना अटक केली आहे. त्यांच्या अल्पवयीन साथीदारांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांची बहीण मोनिका नेटके यांनी तक्रार दिली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सौरभ नेटके आणि तानाजी भोसले हे मांजरी बुद्रूक परिसरात शेजारी राहायला आहेत. त्यांच्यात कट्ट्यावर बसण्यावरुन वाद झाला होता. त्यांच रागातून तानाजी यांच्या मुलाने सौरभ चा भाऊ गौरव यांच्यावर साथीदारान च्य मदतीने कोयत्याने वार केला.त्या नंतर परिसरात आरडाओरडा करून नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली.
याप्रकरणी पोलिस निरिक्षक विजयकुमार शिंदे तपास करत आहेत.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.