योगेश जगतापचा खूण करणाऱ्या 11 जणांवर गुन्हा दाखल, दोघांना अटक …

Rokhthok Maharashtra 14 0

प्रतिनीधी: स्वप्नील कदम बातमीसाठी संपर्क – 8421167509

पिंपरी: पिंपळे गुरव मधील काटे पुरम चौकात काल दिवसा ढवळ्या सराईत गुन्हेगार योगेश जगतापचा तब्बल दहा गोळ्या घालून खून करण्यात आला होता. या प्रकरणी सांगवी पोलीसांनी 11 जनानवर गुन्हा दाखल करुन दोघांना गजाआड केले आहे.

योगेश रवींद्र जगताप ( वय – 36 , रा पिंपळे गुरव) असे खूण झालेल्या सराईताचे नाव आहे. या प्रकरणी त्या चा भाऊ जितेश रवींद्र जगताप ( वय – 25 ) यांनी सांगवी पोलीसात फिर्याद दिली आहे.त्यानुसार गणेश बाजीराव ढमाले, अक्षय केंगले ( दोघेही रा. सांगवी) यांना अटक केली आहे. तर गणेश हनुमंत मोटे, अश्विन आनंदराव चव्हाण, अभिजीत बाजीराव ढमाले, प्रथमेश लोंढे,गणेश उर्फ मोनु सपकाळ, निखील उर्फ डोक्या अशोक गाडूते,राजन उर्फ बबलू रवि नायर, महेश तुकाराम माने, निलेश मुरलीधर इयर ( सर्व रा. सांगवी ) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार , आरोपींनी जुन्या भांडणाचा राग मनात धरून परिसरात वर्चस्व निर्माण करण्याच्या हेतुने सराईत गुन्हेगार योगेश जगताप वर गोळ्या झाडल्या होत्या. यात गंभीर जख्मी झालेल्या योगेशला रुग्णालयात दाखल केले होते. मात्र त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला .

दरम्यान खूण करूनपसार झालेल्या आरोपीच्या शोधासाठी पोलीसांनी पथके रवाना केली होती. दरम्यान पथकाने गणेश ढमाले आणि अक्षय केंगले या दोघांना सांगवीतून अटक केली आहे पोलीस निरीक्षक सुनील तांबे तपास करत आहेत.

 

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.