इमारतीच्या खिडकीचा गज कापून येरवडा कारागृहातील पाच कैदी फरार

Rokhthok Maharashtra 15 0

करोना वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर पुण्यातील येरवडा कारागृहातील काही कैदी शासनाच्या आदेशानुसार  तात्पुरत्या इमारतीमध्ये हलवण्यात आले आहेत.  यामधील ‘मोक्का’च्या गुन्ह्यातील पाच कैदी आज फरार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

अजिंक्य कांबळे, उत्तम कांबळे,सनी पिंटो, देवगण चव्हाण आणि अजिनाथ चव्हाण अशी फरार झालेल्या कैद्यांची नावं आहेत.

पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, येरवडा कारागृहातील काही कैद्यांना करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर तात्पुरत्या इमारतीमध्ये  हलवण्यात आले होते. यातील अजिंक्य कांबळे, उत्तम कांबळे,सनी पिंटो, देवगण चव्हाण आणि अजिनाथ चव्हाण हे पाच आरोपी मोक्याच्या गुन्ह्यातील आहेत.  हे पाच जण इमारतीच्या खिडकीचा गज कापून मध्यरात्रीच्या सुमारास पळून गेले आहेत. ही घटना काही वेळेतच लक्षात येताच आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात करण्यात आली असून, या पाचही जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे येरवडा पोलिसानी सांगितले.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.