मफलरवाला नेता कोण? रोहित पवारांनी घेतलं देवेंद्र फडणवीसांचं नाव!

Rokhthok Maharashtra 9 0

अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या तपासावरून आमदार रोहित पवार यांनी पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. पत्रकार परिषदेत त्यांनी चर्चेत असलेल्या ‘मफलरवाला नेता’ या शब्दाचा खुलासा करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेतलं.
मात्र, फडणवीस यांचा विमान अपघाताशी थेट संबंध असल्याचा आरोप आपण करत नसल्याचं रोहित पवार यांनी स्पष्ट केलं. व्हीएसआर कंपनीला कोण वाचवत आहे, असा सवाल उपस्थित करत त्यांनी फडणवीस यांच्यावर कंपनीला संरक्षण दिल्याचा आरोप केला.
तसंच, अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या तपासावर, व्हीएसआर कंपनीला दिलेल्या कंत्राटावर आणि आर्थिक व्यवहारांवरही त्यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले. कंपनीशी संबंधित परदेशातील मालमत्ता, कथित आर्थिक व्यवहार आणि राजकीय संबंधांबाबतही अनेक दावे केले.
या प्रकरणात केंद्र आणि राज्य सरकारने पारदर्शक चौकशी करावी, अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे.
दरम्यान, रोहित पवार यांच्या या आरोपांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवा वाद निर्माण झाला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सरकारकडून यावर काय प्रतिक्रिया येते, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.