माहेरवरून पाच लाख रुपये आण नाहीतर तुला तलाख देईन नाहीतर तुला मारून टाकेन, अशी धमकी देणाऱ्यास पोलिसांनी पोलिसांनी ठोकल्या बेड्या…!

Rokhthok Maharashtra 1 0

पुणे: प्रतिनिधी ( रमेश निकाळजे )

तुझ्या आई बापाकडून, माहेरहून पैसे आण असे सतत म्हणून स्वतःच्या पत्नीचा शारीरिक छळ करून तिला सिगारेटचे चटके देऊन पतीने तीन वेळा तलाक म्हणत घरात कोंडून ठेवत खुनाचा प्रयत्न केल्याची घटना 21 ऑक्टोबरला लोहगावमध्ये घडली आहे.

याप्रकरणी फारूख शेख (वय 31), नूरजहाँ शेख, शब्बीर शेख, आयेशा शेख अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत, याप्रकरणी 22 वर्षीय महिलेने कोंढवा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे, फिर्यादी महिलेचे आणि फारूखचे नोव्हेंबर 2021 मध्ये लग्न झाले असून लग्न झाल्यापासून त्यांच्या मनासारखे वागले नाही म्हणून फिर्यादीच्या पतीचे दुसरे लग्न लावून देऊ अशी भीती तिच्या सासू व सासऱ्याने फिर्यादीला घातली.

तसेच आई-वडिलांकडून 5 लाख रुपये आण असे म्हणून तिचा छळ केला, तिच्या सासरचे आरोपी लोक एवढ्यावरही थांबले नाहीत, 10 ऑक्टोबर रोजी फिर्यादीचा गळा दाबून खुन करण्याचा प्रयत्न केला, पतीने 21 ऑक्टोबर रोजी तिच्याशी भांडणे काढून तिला
बेदम मारहाण केली, तसेच तिच्या गालावर,हातावर सिगारेटचे चटके देऊन तिच्या तोंडावर उशी दाबून खुन करण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर तिला तीन वेळा तोंडी तलाक देत घरात कोंडून ठेवले.

या सर्व जाचातून तिने काल सुटका करून घेत माहेर गाठले, त्यानंतर आई वडिलांना बरोबर घेऊन कोंढवा पोलिस ठाण्यात जाऊन पती व सासरच्यांविरोधात तक्रार दाखल केली, याप्रकरणी पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक शिळमकर तपास करीत आहेत.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.