Crime news : गणेशोत्सवाच्या दिवशी आईने साडी नेसू दिली नाही म्हणून मुलीची आत्महत्या…!

Rokhthok Maharashtra 1 0

पुणे : प्रतिनिधी : रमेश निकाळजे

पुणे : पुण्यातील देहूरोड परिसरात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीने गणपती उत्सवात आईने साडी नेसू दिली नाही म्हणून टोकाचे पाऊल उचलले. आणि आत्महत्या केली. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. घटना साडी नेसू न दिल्याने एका अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. देहू रोड परिसरातील शिवाजी विद्यालयात ती इयत्ता सातवीत शिकत होती. तीला गणेशउत्सवा दरम्यान साडी नेसायची होती परंतु तीच्या आईने तीला साडी नेसू नको असे सांगितले. या गोष्टीचा राग मनात धरात तीनं आत्महत्या केल्याची माहिती मिळाली आहे. देशात संपुर्ण गणेशोत्स साजरा केला जात आहे आणि एकीकडे पुण्यात अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, ( सुष्मिता प्रधान, वय वर्ष 13 )असं या आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. तीच्या आईने तीला साडी नेसण्यास मनाई केल्यामुळे त्या गोष्टीचा राग मनात धरत ती बाथरुम मध्ये रडत गेली. काही वेळ तीनं स्वत: ला कोंडून ठेवलं. तीच्या बहिणीने काही वेळाने बाथरुमचा दरवाजा वाजवला. परंतु काही प्रतिसाद येत नव्हता यामुळे घरातील सर्व सदस्य घाबरले. बाथरूमच्या दरवाजा तोडून जाण्यास प्रयत्न करू लागले. अखेर बाथरूमचा दरवाजा तोडला. मुलगी गळात स्कार्फ बांधून लटकलेल्या अवस्थेत सापडली.

हे पाहून सर्वांनी आरडाओरड केली. त्यामुळे शेजारच्यांनी देहूरोड पोलीसांत या घटनेची माहिती दिली, पोलीसांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह ताब्यात घेवून आकस्मिक मृत्यूची नोंद केली. पुढील तपास देहूरोड पोलीस करत आहेत.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.