80 टक्के समाजकारणाचा वारसा प्रत्येक शिवसैनिकाने जपला पाहिजे – प्रा.विद्या संतोष होडे

Rokhthok Maharashtra 1 210

कोविडच्या सूक्ष्म विषाणूने कोरोना महामारी च्या काळामध्ये संपूर्ण जगाला वेठीस धरले आहे. अर्थचक्रचा गाडा सुरळीत होता होता पुन्हा एकदा त्याला खीळ बसली आहे. सामान्य जनांना पोटापाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी फार मोठ्या दिव्यातून जावे लागत आहे. अशा परिस्थितीत गरजू आणि गरीब कुटुंबांना सामाजिक बांधिलकी जगत त्यांच्या अन्नधान्याचा प्रश्न सोडविण्यासाठी सावी बहुउद्देशीय सामाजिक संस्था आणि शिवसेना हडपसर विधानसभा समन्वयक विद्या संतोष होडे यांच्या वतीने 100 गरजूंना धान्य किटचे वाटप करण्यात आले.
रोजगार काम धंदा बंद असल्यामुळे आर्थिक टंचाई जाणवत असलेले गरजू गरीब कुटुंब यांना मदत करणे हे शिवसेनेच्या 80 टक्के समाजकारणाला अनुसरूनच आहे, असे प्रा. विद्या होडे म्हणाल्या.
मा मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे कुटुंबप्रमुख या नात्याने संपूर्ण महाराष्ट्राची काळजी घेत आहेत. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून शिवसैनिक म्हणून आपल्या परिसरातील गरजू व्यक्तींना महिनाभर पुरेल असे धान्य किट वाटप करण्यात आले.

0 0 votes
Article Rating
210 Comments
Oldest
Newest Most Voted

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.