राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शिष्टमंडळाने घेतली पुणे महानगरपालिकेच्या प्रशासकांची भेट

Rokhthok Maharashtra 1 0

पुणे महानगरपालिकेवर प्रशासक म्हणून नियुक्त झालेले पुणे महानगरपालिकेचे आयुक्त श्री. विक्रम कुमार साहेब यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शिष्टमंडळाने भेट घेतली.निश्चितच महापौर,सभागृह नेते,स्थायी समिती सभापती यांचा कार्यकाळ जरी संपला असला तरी ,पुणेकरांच्या समस्या मात्र संपल्या नाहीत.येत्या काळात निवडणुकांचा कालावधी जरी लांबला तरी विक्रम कुमार यांच्या माध्यमातून पुणेकरांच्या समस्या सुटतील. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रशासनास पूर्णपणे सहकार्य करेल अशी खात्री यानिमित्ताने या शिष्टमंडळाने दिली.
या शिष्टमंडळात माझ्यासह माजी महापौर सौ. राजलक्ष्मीताई भोसले, वैशालीताई बनकर,माजी उपमहापौर दिपकभाऊ मानकर, दिलीप बराटे, मा.सभागृह नेते सुभाष जगताप, स्थायी समितीचे माजी चेअरमन विशाल तांबे, बाबुराव चांदेरे, अश्विनीताई कदम, बाळासाहेब बोडके,नगरसेवक सचिन दोडके, शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष, प्रदीप धुमाळ, शहर समन्वयक महेश हांडे आदी उपस्थित होते.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.