इंडियन डेंटल असोसिएशन, हडपसरच्या वतीने विभागीय काँफेरन्सचे आयोजन

Rokhthok Maharashtra 1 0

इंडियन डेंटल असोसिएशन , हडपसर शाखेतर्फे सुझलॉन मगरपट्टा येथे दिनांक 25 व 26 जून 2022 रोजी या वर्षीच्या विभागीय काँफेरन्स चे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती अद्यक्ष डॉ अक्षय राऊत यांनी दिली . या conference मध्ये दंतवैद्यक शास्त्रातील अद्ययावत प्रक्रिया आणि साधनसामग्रीवर 24 ते 30 व्याख्याने निष्णात दंतवैद्यकडून दिली जाणार आहेत .या कॉन्फरन्स साठी पूर्ण महाराष्ट्रतून जवळपास 400 दंतवैद्य उपस्थित राहणार असल्याचे सचिव डॉ प्रतीक राऊत यांच्याकडून कळाले.तसेच या प्रसंगी आधुनिक तंत्रज्ञान आणि दंतवैद्यक शास्त्रातील नित्योपयोगी साहित्याचे प्रदर्शन आणि विक्री साठी जवळपास 25 ते 30 नामांकित कंपन्यानी आपला सहभाग निश्चित केला आहे असेही कोषाध्यक्ष डॉ नितीन सपाट यांनी सांगितले.
नोबेल हॉस्पिटल चे प्रमुख  डॉ दिलीप माने सरांच्या शुभहस्ते या मेळाव्याचे उदघाटन दिनांक 25 रोजी करण्याचे योजिले आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.