कोंढवा येथे पेट्रोल चोरीचा आरोप केला म्हणून चार जणांनी एका तरुणावर कोयत्याने केला खुन ,तरुण गंभीर जखमी चौघांविरुद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…!

Rokhthok Maharashtra 1 0

पुणे: प्रतिनिधी ( रमेश निकाळजे )

कोंढवा येथे पेट्रोल चोरीचा आरोप केल्याच्या रागातून एका तरुणावर चार जणांनी कोयत्याने वार करुन तसेच दगडाने त्याला जीवे मारण्याचा प्रकार घडाला आहे. ही घटना मध्यरात्री दिडच्या च्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अविराज शिंदे, आणि तीन अनोळखी अशी गुन्हा दाखल केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी फिरोज जमालउद्दीन शेख (वय २७, रा. भाग्योदयनगर, कोंढवा खुर्द) याने तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी फिरोज शेख याने आरोपी अविराज शिंदे याच्यावर पेट्रोल चोरीचा आरोप केला होता.काल मध्यरात्री आपली दुचाकी सोसायटीच्या बाहेर पार्क करीत असताना, तिथे आरोपी अविराज शिंदे आला आणी माझ्यावर खोटा आरोप करतो का थांब तुला खल्लास च करतो असे म्हणत कोयत्याने याच्या डोक्यात वार केला,

तसेच आरोपी अविराज शिंदे याच्याबरोबर आलेल्या तीन जणांनी मिळून फिरोज शेख याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, यावेळी फिरोज शेख पळून जाण्याच्या पर्यंत करत असताना त्याच्या अंगावर दगडी फेकून मारून त्याला जखमी केले. याप्रकरणी फिरोज शेख याने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली, या घटनेचा पुढील तपास कोंढवा पोलीस करीत आहेत.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.