गणवेश आणि पुस्तकांची सक्ती थांबवा, नाहीतर कारवाई

Rokhthok Maharashtra 19 0

पुणे जिल्ह्यातील खासगी शाळांना मोठा इशारा देण्यात आला आहे.
जिल्हा परिषद शिक्षण विभागाने स्पष्ट सांगितलं आहे की, विद्यार्थ्यांना गणवेश आणि पुस्तकं शाळेतूनच खरेदी करण्याची सक्ती करू नये.अनेक पालकांनी तक्रार केली होती की, शाळा बाजारापेक्षा जास्त दराने गणवेश आणि पुस्तकं विकत घेण्यास भाग पाडत आहेत. यामुळे पालकांची आर्थिक पिळवणूक होत आहे. याच पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने कडक भूमिका घेतली आहे.

तसेच शासनाने दर दोन वर्षांनी १५ टक्क्यांपर्यंत शुल्क वाढ करण्याची तरतूद असतानाही काही शाळा त्यापेक्षा अधिक शुल्कवाढ करत असल्याचेही आढळले आहे. ही बाब गंभीर मानून शिक्षण विभागाने शाळांना नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान, अशा प्रकारच्या तक्रारी आल्यास पालकांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.