पुण्यात गर्भलिंग निदान रॅकेटचा मोठा पर्दाफाश 🚨 सहावे सोनोग्राफी मशीन जप्त

Rokhthok Maharashtra 15 0

पिंपरी निर्मळ येथील बेकायदा गर्भलिंग निदान आणि स्त्री भ्रूणहत्या प्रकरणात पोलिसांनी मोठा पर्दाफाश केला आहे.
या आंतरजिल्हा रॅकेटचा तपास करताना पुण्यातून सहावे अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन जप्त करण्यात आले आहे.

वाघोली येथील डॉ. अतुल जाधव याला अटक केल्यानंतर चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली.
डॉ. जाधव हा बेकायदेशीर गर्भलिंग निदानासाठी हे मशीन वापरत असल्याचे तपासात उघड झाले आहे.

याआधी अटक केलेल्या मेडिकल साहित्य पुरवठादार नरेंद्र ठाकरे याच्याकडून हे मशीन खरेदी केल्याची कबुलीही त्याने दिली आहे.
पोलिसांनी छापा टाकून विनानोंदणीकृत मशीन जप्त केले.

या रॅकेटमध्ये डॉक्टर, एजंट आणि बेकायदेशीर गर्भपात केंद्रांचे मोठे जाळे सक्रिय असल्याचे समोर आले आहे.
आतापर्यंत सहा मशीन जप्त करण्यात आली असून तपास अधिक वेगाने सुरू आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.