पुण्यात संतापजनक घटना! पतीने पत्नीचा जीव घेतला

Rokhthok Maharashtra 28 0

पुण्यातील खराडी परिसरात संतापजनक घटना समोर आली आहे. किरकोळ वादातून पतीने पत्नीच्या डोक्यात गॅस सिलेंडर मारून तिचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
मृत महिलेचं नाव किरण जयराम बाबर असून तिचं वय ३० ते ३२ वर्षांच्या दरम्यान असल्याचं सांगितलं जात आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, दोघेही मूळचे मध्य प्रदेशातील असून खराडीतील एका लेबर कॅम्पमध्ये राहत होते. उदरनिर्वाहासाठी ते कचरा गोळा करण्याचं काम करत होते.
मंगळवारी मध्यरात्री किरकोळ कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. वाद वाढल्यानंतर संतापाच्या भरात पती जयराम बाबर याने घरातील छोटा गॅस सिलेंडर पत्नीच्या डोक्यात मारला.
या हल्ल्यात गंभीर दुखापत होऊन किरणचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपी पती फरार झाला असून पोलिसांनी त्याच्या शोधासाठी पथक रवाना केलं आहे.
या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.