मोठी बातमी! मुख्यमंत्री निधी 8 तासांत मंजूर | अर्जाची गरज संपली

Rokhthok Maharashtra 1 0

राज्यातील रुग्णांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे.
मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवी ऑनलाईन प्रणाली लवकरच सुरू होणार असून, आता अर्ज मंजुरी अवघ्या ८ तासांत होणार आहे.
विशेष म्हणजे, रुग्णांना स्वतः अर्ज करण्याची गरज राहणार नाही. संबंधित रुग्णालयातूनच थेट अर्ज सादर केला जाणार आहे, त्यामुळे प्रक्रिया अधिक सोपी आणि जलद होणार आहे.
या नव्या प्रणालीचे उद्घाटन लवकरच Devendra Fadnavis यांच्या हस्ते होणार आहे.

 

गेल्या वर्षभरात ४० हजारांहून अधिक रुग्णांना तब्बल ३३३ कोटी रुपयांची मदत देण्यात आली होती. आता या नव्या प्रणालीमुळे रुग्णांना वेळेत उपचार मिळण्यास मोठी मदत होणार आहे.
अधिक माहितीसाठी १८०० १२३ २२११ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.