“वानवडीकरांच्या हक्कासाठी राष्ट्रवादीचा लढा | फातिमा नगर चौकातील मनमानी निर्णयाविरोधात तीव्र आंदोलन”

Rokhthok Maharashtra 2 0

वानवडीकरांच्या दळणवळणाच्या हक्कासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार पक्ष) रस्त्यावर उतरली आहे.

पुणे शहराकडून वानवडीत प्रवेश करण्यासाठी अत्यंत महत्वाचे ठिकाण म्हणजे सोलापूर महामार्गावरील फातिमा नगर चौक. रोज हजारो वाहने या चौकातून वानवडीत प्रवेश करतात. या चौकामुळे वानवडीच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळते तसेच नागरिकांना दळणवळणाची सुविधा मिळते.

मात्र, पुणे महानगरपालिका व पुणे पोलीस प्रशासनाने कोणतेही कारण न देता या ठिकाणी उजवीकडे वळण बंद केले आहे. त्यामुळे शहरातून वानवडीमध्ये येणाऱ्या वाहनांना जवळपास ५०० मीटर पुढे जाऊन यू-टर्न घेऊन पुन्हा ५०० मीटर परत यावे लागत आहे. हा निर्णय वानवडीकरांवर अन्याय करणारा असल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून करण्यात आला आहे.

या मनमानी कारभाराविरोधात शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली फातिमा नगर चौक येथे तीव्र आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार पक्ष) चे केवीन मॅन्युअल, प्रफुल्ल जांभुळकर, आविनाश काळे, प्रकाश भंडारी, रवि परदेशी, रमीज सय्यद, आशाताई शिंदे, रोहित साळवे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले.

प्रशासनाच्या मनमानी कारभाराचा निषेध व्यक्त करत वानवडीकरांच्या हक्कासाठी राष्ट्रवादीने रस्त्यावर उतरून लढा दिला.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.