सावित्रीबाई फुलेंच्या वेशात खासदारकीची शपथ!

Rokhthok Maharashtra 18 0

राज्यसभेत एक अनोखा आणि भावनिक क्षण पाहायला मिळाला…नवनिर्वाचित खासदारांच्या शपथविधीदरम्यान शिवसेना नेत्या ज्योती वाघमारे यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.ज्योती वाघमारे यांनी थेट सावित्रीबाई फुले यांच्या वेशात खासदारकीची शपथ घेतली.
डोक्यावर पदर, हातात संविधान आणि कपाळावर आडवी चिरी—असा त्यांचा लूक पाहून संपूर्ण सभागृह भारावून गेलं.

https://www.instagram.com/rokhthokmaharashtra/reel/DW0-r19jgWA/

 

सामाजिक परिवर्तनासाठी आयुष्य वेचणाऱ्या सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यासाठी त्यांनी हा वेष परिधान केल्याचं सांगितलं जात आहे.त्यांच्या या कृतीचं सभागृहात टाळ्यांच्या गजरात स्वागत करण्यात आलं.दरम्यान, या शपथविधीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.