सोशल मीडियावरील वादातून २१ वर्षीय तरुणाची हत्या! ७ आरोपींवर खुनाचा गुन्हा

Rokhthok Maharashtra 5 0

बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यात सोशल मीडियावरील किरकोळ वादाचे पर्यवसान थेट हत्येत झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. २१ वर्षीय ज्ञानेश्वर वाकडे यांच्या हत्येप्रकरणी सात जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
११ जुलै रोजी रात्री अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर येथे ज्ञानेश्वर उत्तरेश्वर वाकडे यांची हल्लेखोरांनी जीवघेणा हल्ला करून हत्या केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी ज्ञानेश्वर यांच्या वडिलांच्या फिर्यादीवरून अंबाजोगाई ग्रामीण पोलिस ठाण्यात सात आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी तातडीने कारवाई करत पाच आरोपींना अटक केली असून, पळून जाण्याच्या प्रयत्नात एका आरोपीचा पाय जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, आरोपींना आश्रय दिल्याचा आरोप असलेल्या संबंधितांवरही कारवाई करण्याची मागणी करत संतप्त ग्रामस्थांनी पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले.पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, उर्वरित आरोपींचा शोध घेतला जात आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.