आयडियल एज्युकेशन ट्रस्ट शैक्षणिक संकुलात १३५ वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

Rokhthok Maharashtra 3 0

आयडियल एज्युकेशन ट्रस्ट शैक्षणिक संकुलात १३५ वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. शोएब इनामदार साहेब यांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान कार्याचा व समाजासाठी दिलेल्या योगदानाचा थोडक्यात आढावा घेत उपस्थितांना मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष शफी इनामदार साहेब, शकिला इनामदार, डॉ. अबोली इनामदार, अशोक कांबळे, प्रा रिफान इनामदार, मंगेश अल्हाट साहेब, नंदाताई कांबळे, वसंत वाघमारे साहेब, विजया सावंत, सुनील कांबळे, लहू खराटे, लता शेलार, शिवाजी सोनवणे, अनिल धावरे, बाळासाहेब नितनवरे, तनुजा शेलार, मच्छिंद्र मिसाळ, काशाबाई वानखेड आदी मान्यवर उपस्थित होते.

संस्थेचे कार्याध्यक्ष फहीम इनामदार यांनी सर्व मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. संस्थेच्या वतीने दरवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयीन शिष्यवृत्ती ची घोषणा करण्यात आली. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे महत्त्व, शिक्षणाचे महत्त्व आणि सामाजिक समतेसाठी त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव केला. तसेच विद्यार्थ्यांनी देखील उत्स्फूर्तपणे आपले मनोगत व्यक्त करून बाबासाहेबांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

या कार्यक्रमास तिन्ही माध्यमांचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इम्रान शेख यांनी प्रभावीपणे केले, तर कार्यक्रमाचे आभार बाबुलाल मनूरे यांनी मानले.

एकूणच, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात, शिस्तबद्ध व प्रेरणादायी वातावरणात पार पडला.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.