उद्यापासून कर्मचाऱ्यांचा संप, सरकारचे कडक आदेश!

Rokhthok Maharashtra 14 0

महाराष्ट्रात मोठी घडामोड… राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा उद्यापासून बेमुदत संप!
विविध मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी हा संप पुकारला असून, राज्यभरातील शासकीय कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, सरकारने कडक भूमिका घेत सर्व विभागांना तातडीचे आदेश दिले आहेत…
संपात सहभागी होणं ‘गैरवर्तन’ मानलं जाईल आणि शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते, असा इशारा देण्यात आला आहे.

इतकंच नाही, तर संपकाळात वेतनही रोखलं जाऊ शकतं…
सर्व कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द करण्याचे आदेश देण्यात आले असून, आवश्यक असल्यास पोलीस बंदोबस्तही ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.
यामुळे उद्यापासून राज्यातील प्रशासन ठप्प होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे…

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.