गॅस सबसिडी पाहायला गेली अन् खात्यात दिसले १०० कोटी! महिला आणि बँक कर्मचारीही चक्रावले

Rokhthok Maharashtra 38 0

एक धक्कादायक आणि तितकीच आश्चर्यचकित करणारी घटना पश्चिम बंगालमधून समोर आली आहे.
एलपीजी गॅसची सबसिडी जमा झाली का, हे तपासण्यासाठी बँकेत गेलेल्या ३६ वर्षीय काश्मिरा शेख यांच्या खात्यात तब्बल १०० कोटी रुपये असल्याचे पासबुकमध्ये दिसले. ही रक्कम पाहून महिला, तिचे कुटुंब आणि बँक कर्मचारीही अवाक झाले.

https://youtube.com/shorts/2AIifJP0RSY

मात्र, आनंद फार काळ टिकला नाही. बँकेने चौकशी सुरू करत तात्काळ संबंधित खाते गोठवले. प्राथमिक माहितीनुसार, हा प्रकार बँकेच्या सर्व्हरमधील तांत्रिक बिघाडामुळे झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, याबाबत बँकेकडून अद्याप अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.
सध्या या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून, खात्यातील रक्कम वापरण्यास महिलेला परवानगी नाही.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.