चुलत्याकडून अत्याचारानंतर अल्पवयीन मुलीचा मृत्यू |

Rokhthok Maharashtra 20 0

बीड जिल्ह्यातून एक अत्यंत संतापजनक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे…
केज तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीवर तिच्याच नात्यातील व्यक्तीकडून अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली.
माहितीनुसार, ५ एप्रिल रोजी सायंकाळी ही मुलगी गोठ्यातून घरी जात असताना आरोपीने तिच्यावर बळजबरी केली.

या अमानुष घटनेनंतर मानसिक धक्क्यात गेलेल्या मुलीने विष प्राशन करून जीवन संपवण्याचा प्रयत्न केला.
तिला तातडीने छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं… मात्र दोन दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर शुक्रवारी तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.
या प्रकरणाने संपूर्ण बीड जिल्हा हादरला असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
या घटनेतून पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे…

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.