ज्या परिसरात अवैध्य धंदे चालू आहेत त्या परिसरातील नागरिकांनी अवैध्य धंद्येवाल्यांची माहिती पोलिसांना द्यावी ; पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार…!

Rokhthok Maharashtra 2 0

पुणे : प्रतिनिधी 

पुणे: पुणे शहर आणि परिसरातील नागरिकांनी अवैध्य धंदे चालवत असलेले तसेच गुन्हेगारांची माहिती बिनधास्तपणे जवळच्या पोलिस ठाण्यात किंवा ११२ क्रमांकावर द्यावी. पोलिस निश्चितपणे त्यांच्यावर कडक कारवाई करतील. तसेच कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांकडून कठोर कारवाई करण्यात येईल,’ असे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले आहे. सध्या सर्वत्र रमजान ईद चालू आहे. रमझान ईद निमित्त कोंढवा पोलिस ठाण्याच्या वतीने कौसरबाग येथील मैदानावर गुरुवारी सायंकाळी आयोजित ‘दावत ए इफ्तार’ या कार्यक्रमात पोलिस आयुक्त अमितेश कुमार बोलत होते.

 

त्यावेळी बोलताना त्यांनी मुस्लिम समाजाला पवित्र रमझान ईद सणाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला आमदार चेतन तुपे, माजी आमदार महादेव बाबर, योगेश टिळेकर, पोलिस सहआयुक्त प्रवीण पवार, अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील, पोलिस उपायुक्त आर. राजा, सहायक आयुक्त गणेश इंगळे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष सोनवणे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) मानसिंग पाटील, माजी नगरसेवक गफूर पठाण, साईनाथ बाबर, नंदा लोणकर, हसीना इनामदार, जाहीद शेख, मौलाना इद्रिस कादरी, सूफी अन्वर, आबिद सय्यद, राहुल डंबाळे, अली दारूवाला, समीर अन्सार शेख इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

 

पुणे शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस कटिबद्ध आहेत.त्यामुळे परिसरातील सजग नागरिकांनी अवैध्य धंद्यांसह गुन्हेगार आणि अमली पदार्थ विक्रेत्यांची माहिती पोलिसांना द्यावी.माहिती मिळताच गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्यात येईल. पोलिसांना माहिती देणाऱ्या नागरिकांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल त्यामुळे त्यांना कसलाही त्रास होणार नाही,’ अशी ग्वाही अमितेश कुमार यांनी दिली.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.