पुणे पोलिसांची मोठी कामगिरी! उत्तर प्रदेशातून दोन घरफोड्यांना अटक
पुणे विश्रामबाग पोलिसांची मोठी कामगिरी! चार राज्यांत तपास करून घरफोडीचा गुन्हा उघड; उत्तर प्रदेशातून दोन आरोपींना अटक!
पुणे शहरातील विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने मोठी कामगिरी केली आहे. दिल्ली, हरियाणा, मध्यप्रदेश आणि उत्तर प्रदेश अशा चार राज्यांत तपास करून घरफोडीच्या गुन्ह्यातील दोन आरोपींना उत्तर प्रदेशातून अटक करण्यात आली आहे.
विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३२७/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम ३०५(अ), ३३१(३) आणि ३(५) नुसार गुन्हा दाखल होता. अज्ञात आरोपींनी घराचा दरवाजा तोडून दागिन्यांची चोरी केली होती.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक नवनाथ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश कारके यांनी तपास पथकाला सूचना दिल्या. त्यानुसार पोलीस अंमलदार अर्जुन थोरात यांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींची छायाचित्रे मिळवली.
त्यानंतर पोलीस हवालदार नितीन मुंढे, पोलीस अंमलदार अनिस शेख यांना गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार हबीब हफीज सैफी आणि अकबर उर्फ फिरोज सुलतान सैफी या दोघांना उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथून अटक करण्यात आली. आरोपींकडून सुमारे १० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या कारवाईत पोलीस अंमलदार शिवदत्त गायकवाड यांच्यासह तपास पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त कृषिकेश रावले आणि सहाय्यक पोलीस आयुक्त अनुजा देशमाने सहायक पोलीस आयुक्त नवनाथ जगताप ,वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास भिंगारदिवे ,रमेश लाहिगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
उमेश कारके, सत्यवान गेंड, मेहबूब मोकाशी, सचिन कदम, नितीन मुंढे, महेश कदम, शैलेश सुर्वे, सचिन अहिवळे, शशिकांत दरेकर, कैलास डुकरे, जाकीर मणियार, फिरोज इनामदार, अनिस शेख, शिवदत्त गायकवाड, अर्जुन थोरात आणि नितीन बाबर या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तपस पथकात सहभाग घेतला





