३० हजार फूट उंचीवर विमान! पुण्यातील तरुणाने उघडण्याचा प्रयत्न केला इमर्जन्सी दरवाजा; प्रवाशांत घबराट

Rokhthok Maharashtra 8 0

विमानाने दिल्लीहून उड्डाण केल्यानंतर काही वेळातच अचानक सेन्सरचा अलार्म वाजू लागला. वैमानिक आणि क्रू मेंबर्सनी तपासणी केली असता सीट क्रमांक १९ बी वर बसलेला गौरव हा आपत्कालीन दरवाजाच्या लिव्हरवरील प्लास्टिक कव्हर उघडण्याचा प्रयत्न करत असल्याचं निदर्शनास आलं.
कर्मचारी आणि सहप्रवाशांनी तातडीने त्याला रोखलं.
विशेष म्हणजे, आपत्कालीन दरवाजा म्हणजे साधी खिडकी असल्याचा गैरसमज झाल्यामुळे आपण तो उघडण्याचा प्रयत्न केल्याचा दावा त्याने केल्याची माहिती आहे.
या प्रकरणी इंडिगोच्या सुरक्षा विभागातील अधिकाऱ्यांनी तक्रार दिल्यानंतर विमानतळ पोलिसांनी गौरव रौतेलाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मात्र, हजारो फूट उंचीवर हवेत असलेल्या विमानात असा निष्काळजीपणा म्हणजे शेकडो प्रवाशांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार ठरू शकतो!
आता या प्रकरणात पोलीस तपासात काय निष्पन्न होतं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.