मृत्यूपूर्वी भावाला पाठवला मेसेज! पायलच्या मृत्यूने पुण्यात खळबळ; सासूवर गंभीर आरोप

Rokhthok Maharashtra 10 0

पुण्यात पुन्हा एकदा हुंडाबळीचा संशय… दिवाळी आली की सोन्याची मागणी, माहेरच्या संपत्तीवर डोळा आणि मुलीच्या हिश्श्याची जमीन नावावर करण्यासाठी तगादा… अखेर सात वर्षांच्या संसाराचा असा दुर्दैवी शेवट झाला की, संपूर्ण महाराष्ट्र हादरला!
पुण्यातील पायल पवार-झांबरे मृत्यू प्रकरणाने पुन्हा एकदा विवाहित महिलांच्या सुरक्षिततेचा आणि हुंड्यासाठी होणाऱ्या छळाचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आणला आहे.
खेड-शिवापूर परिसरातील श्रीरामनगर येथील शेतकरी व व्यावसायिक रवींद्र पवार यांची मुलगी पायल हिचा सात वर्षांपूर्वी पुण्यातील मुकुंदनगर येथील अक्षय झांबरे याच्याशी विवाह झाला होता.
माहेरच्या मंडळींच्या आरोपानुसार, लग्नात मोठ्या प्रमाणात हुंडा आणि सोनं दिल्यानंतरही सासरच्या मंडळींच्या मागण्या थांबल्या नाहीत.
दरवर्षी दिवाळी आली की पाच ते दहा तोळे सोन्याची मागणी केली जात होती. मुलीला त्रास होऊ नये म्हणून माहेरचे कुटुंब या मागण्या पूर्ण करत होते.
मात्र यंदा दुष्काळी परिस्थिती आणि आर्थिक अडचणींमुळे सोनं देणं शक्य नसल्याचं पवार कुटुंबाने सांगितलं. त्याचबरोबर पायलच्या वाट्याला येणारी जमीन पतीच्या नावावर करून देण्यासाठीही दबाव टाकला जात असल्याचा आरोप आहे.

पायलचे वडील रवींद्र पवार यांनी मुलीच्या मृत्यूने आक्रोश व्यक्त केला. तर तिचे चुलते राजेंद्र पवार यांनी फरार आरोपींना आश्रय देणाऱ्यांचीही चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली आहे.
मात्र आता या प्रकरणात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत…
दरवर्षी दिवाळीत सोन्याची मागणी केली जात होती का?
पायलच्या मालमत्तेतील हिश्श्यासाठी खरोखरच दबाव टाकला जात होता का?
मृत्यूपूर्वी पाठवलेल्या मेसेजमधील आरोपांची पोलिस चौकशी काय सांगते?
सासू, सासरे आणि नणंद नेमके कुठे आहेत?
आणि पायलच्या मृत्यूमागचं खरं कारण काय?
पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर आता पायल पवार-झांबरे मृत्यू प्रकरणाने पुन्हा एकदा हुंडा आणि विवाहित महिलांच्या छळाचा प्रश्न उपस्थित केला आहे.
मागणी सोन्याची असो किंवा मालमत्तेची… एका मुलीचा जीव जाण्याइतकी ती मोठी कधीच असू शकत नाही!
पायलला न्याय मिळणार का? फरार आरोपी कधी पोलिसांच्या ताब्यात येणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
अपडेट साठी पाहत रहा रोखठोक महाराष्ट्र न्यूज!

 

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.