उसाला दर नाही तर दिवाळी रस्त्यावर! राजू शेट्टींचा सरकारला इशारा!

Rokhthok Maharashtra 6 0

उसाला दर मिळाला नाही तर दिवाळी रस्त्यावरच! राजू शेट्टींनि सरकारला थेट इशारा दिला आहे
दिवाळीचा सण जवळ आला असताना बळीराजाच्या घरात मात्र चिंतेचं वातावरण आहे. उसाला योग्य दर मिळावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने महामार्गावर चक्काजाम आंदोलन पुकारलं.
संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूरमधील किणी टोलनाका आणि सातारा जिल्ह्यातील नागठाणे येथे पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर जोरदार आंदोलन करण्यात आलं.
यावेळी शेतकऱ्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी करत उसाला योग्य दर देण्याची मागणी केली. ‘आम्ही शेतकरी आहोत, भिकारी नाही! आमच्या घामाचा योग्य मोबदला द्या,’ अशी आक्रमक भूमिका आंदोलकांनी मांडली.
राजू शेट्टी यांनीही सरकारला इशारा देताना, उसाला योग्य दर मिळाला नाही तर दिवाळी रस्त्यावरच साजरी करू, असं स्पष्ट केलं.
या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.
आता सरकार शेतकऱ्यांच्या मागण्यांची दखल घेणार का? उसाला योग्य दर मिळणार का? की यंदा बळीराजाची दिवाळी आंदोलनातच जाणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे!

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.