डॉक्टरला ब्लॅकमेल करून आत्महत्येला प्रवृत्त? पासवर्डमुळे उघड झाला थरारक सत्य!

Rokhthok Maharashtra 19 0

नमस्कार… बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
२९ वर्षीय डॉक्टर मंदार दाभाडे यांनी आत्महत्या केल्याप्रकरणी मोठा खुलासा झाला आहे.
६ एप्रिल रोजी अंबाजोगाईतील राहत्या घरात त्यांनी गळफास घेतल्याची घटना उघडकीस आली होती. मात्र, मृत्यूपूर्वी त्यांनी भावाला मोबाईलचा पासवर्ड पाठवला होता… आणि हाच पासवर्ड ठरला या प्रकरणाचा टर्निंग पॉइंट!

अंत्यविधीनंतर जेव्हा भावाने मोबाईल उघडला… तेव्हा सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर आली. “सॉरी पप्पा आणि भैया…” असं लिहित मंदार यांनी आपली वेदना मांडली होती.
एका महिलेने आक्षेपार्ह व्हिडिओ पाठवत शरीरसंबंधासाठी दबाव टाकला… इतकंच नाही, तर “लग्न नाही केलं तर आत्महत्या करीन आणि तुझं नाव लिहीन” अशी धमकी देत ब्लॅकमेल सुरू केल्याचा आरोप आहे.
सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून डॉक्टर दाभाडे यांनी टोकाचं पाऊल उचलल्याचं समोर आलं आहे.
या प्रकरणी पोलिसांनी संबंधित महिलेविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.