पुण्यात रिअल इस्टेटच्या नावाखाली 8.81 कोटींची फसवणूक!

Rokhthok Maharashtra 28 0

पुण्यात रिअल इस्टेटच्या नावाखाली तब्बल पावणे नऊ कोटींची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
‘ड्रिम्स कॉर्पोरेशन’च्या संचालकांसह चार जणांविरोधात चतुःशृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, ५७ वर्षीय व्यावसायिक राजेश कोठारी आणि त्यांच्या आई प्रेमा कोठारी यांनी आरोपी रमेश मेहता आणि त्याच्या भागीदारांच्या विविध रिअल इस्टेट प्रोजेक्ट्समध्ये मोठी गुंतवणूक केली होती.गुंतवणुकीवर परतावा देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र ठरल्याप्रमाणे परतावा न देता आरोपींनी ‘नोटराईज एमओयू’ करून गुंतवणुकीच्या बदल्यात फ्लॅट्स देण्याचे मान्य केले.परंतु मुदत संपल्यानंतरही ना फ्लॅट्स मिळाले, ना पैसे परत मिळाले. त्यामुळे कोठारी कुटुंबीयांनी पोलिसांकडे धाव घेतली.या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास सुरू असून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.