हडपसरमध्ये भाड्यावरून वाद, रिक्षाचालकाच्या डोक्यात दगड!

Rokhthok Maharashtra 1 0

पुण्यातील हडपसर परिसरात भाड्यावरून झालेला वाद हिंसक वळणावर गेला आहे.
प्रवाशाने रिक्षाचालकाच्या डोक्यात दगड मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
जखमी रिक्षाचालकाचे नाव ईश्वर बरोडा पवार, वय ३७, वैदुवाडी येथील रहिवासी आहे. तर आरोपीचे नाव भागवत गुंडाप्पा वाले, वय २५, माळवाडी येथील असल्याचे पोलिसांनी सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार, १८ जून रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास हडपसर गाडीतळ परिसरात ईश्वर पवार रिक्षा घेऊन उभे होते. त्यावेळी आरोपीने वैदुवाडीपर्यंतचे भाडे विचारले. याचवेळी दोघांमध्ये भाड्यावरून वाद सुरू झाला.
वाद इतका वाढला की आरोपीने रिक्षाचालकाला शिवीगाळ करत मारहाण केली आणि जवळचा दगड उचलून त्यांच्या डोक्यात मारला. या हल्ल्यात पवार गंभीर जखमी झाले. घटनेनंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून हडपसर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार मुंढे करत आहेत.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.