फुरसुंगीतील शाळेत धर्मांतराचा प्रयत्न? पालकांचा गंभीर आरोप!

Rokhthok Maharashtra 2 0

पुण्यातील फुरसुंगी येथील विबग्योर स्कूलमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दहावीतील एका विद्यार्थिनीवर धार्मिक प्रभाव टाकून धर्मांतर करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप पालकांनी केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विद्यार्थिनी तब्येत बिघडल्यामुळे शाळेच्या ‘सिक बे’मध्ये गेली होती. मात्र, वैद्यकीय मदतीऐवजी तिच्याशी ख्रिश्चन धर्म, श्रद्धा आणि धर्मांतर यावर चर्चा करण्यात आल्याचा आरोप आहे.
तसेच संबंधित कर्मचाऱ्याने स्वतःचा धर्मांतराचा अनुभव सांगत चर्चमध्ये जाण्यामुळे आयुष्यात सकारात्मक बदल झाल्याचे सांगितल्याचे पालकांचे म्हणणे आहे.
या प्रकरणावर शाळा प्रशासनाने पडदा टाकण्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
सध्या हा मुद्दा पालकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण करत असून, याबाबत चौकशीची मागणी होत आहे

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.