सांगलीत पोलिस मुख्यालयासमोरच ‘कपल्स फ्रेंडली’ कॅफेंचा धक्कादायक प्रकार!

Rokhthok Maharashtra 1 0

सांगली शहरात धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिस मुख्यालयासमोरच असलेल्या काही कॅफेंमध्ये अंधाऱ्या खोल्या, पडद्याआड व्यवस्था आणि ‘कपल्स फ्रेंडली’ मिनी लॉजच्या नावाखाली अश्लील कृत्यांना प्रोत्साहन दिले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
कॅफेमधील अत्याचाराच्या घटनेनंतर शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान आक्रमक झाली असून संस्थापक नितीन चौगुले यांच्या नेतृत्वाखाली विश्रामबाग आणि शहर परिसरातील आठ कॅफेंवर छापे टाकण्यात आले.
महावीर उद्यान परिसर, आलदर चौक आणि विलिंग्डन महाविद्यालयाजवळील काही कॅफेंमध्ये पडदे लावून प्रेमीयुगुलांसाठी स्वतंत्र जागा तयार केल्याचा दावा करण्यात आला. काही ठिकाणी कॅफे चालकांनी शटर बंद करून पलायन केल्याचेही सांगितले जात आहे.
या कारवाईदरम्यान पोलिस अधिकाऱ्यांनाही घटनास्थळी बोलावण्यात आले. अवैध कॅफेंविरोधात तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, नितीन चौगुले यांनी पोलिसांनी कारवाई न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. आता या प्रकरणात प्रशासन आणि पोलिस काय भूमिका घेतात, याकडे संपूर्ण सांगलीकरांचे लक्ष लागले आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.