फेसबुक पोस्टनंतर शेतकऱ्याची आत्महत्या 😢 पत्नीवर गंभीर आरोप

Rokhthok Maharashtra 21 0

बीड जिल्ह्यातील एक धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना…
परळी तालुक्यातील नागापूर येथील Rameshwar Gawhane यांनी आत्महत्या करत आयुष्य संपवलं… पण त्याआधी त्यांनी फेसबुकवर लिहिलेली पोस्ट सगळ्यांना हादरवून गेली!
या पोस्टमध्ये त्यांनी पत्नी आणि काही नातेवाईकांकडून होत असलेल्या मानसिक आणि शारीरिक छळाचा आरोप केला…
मारहाण, अपमान, पैशांसाठी दबाव… आणि सतत त्रास दिला जात असल्याचं त्यांनी स्पष्ट लिहिलं होतं.

इतकंच नाही… काही डॉक्टर आणि वकिलांची नावं घेत गंभीर आरोपही केले…
फेसबुक पोस्ट केल्यानंतर अनेकांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला… पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता…
शेतात जाऊन त्यांनी टोकाचं पाऊल उचललं…
ही घटना केवळ एका व्यक्तीची नाही… तर मानसिक तणाव आणि कौटुंबिक संघर्ष किती भयानक रूप घेऊ शकतो याचं जिवंत उदाहरण आहे…

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.