बिचुकलेंना विधान परिषदेची संधी?

Rokhthok Maharashtra 14 0

विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट समोर आला आहे…
अभिजीत बिचुकले यांना विधान परिषदेवर संधी द्यावी, अशी अनपेक्षित मागणी करण्यात आली आहे…
सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थेट पत्र पाठवत ही मागणी केली आहे…
सध्या चर्चेत असलेल्या नीलम गोऱ्हे यांच्या जागी बिचुकले यांना संधी द्यावी, असं त्यांनी म्हटलं आहे…
देसाई यांच्या मते, नीलम गोऱ्हे यांना अनेकदा संधी मिळूनही पक्षवाढीत अपेक्षित काम दिसलं नाही…
तसंच नव्या आणि प्रभावी नेतृत्वाला संधी देण्याची गरज असल्याचंही त्यांनी नमूद केलं…
दरम्यान, अभिजीत बिचुकले यांनी स्वतः अशी कोणतीही मागणी केलेली नाही…
मात्र या मागणीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे…
विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर आलेल्या या घडामोडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे…

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.