भोंदू खरात प्रकरणात मोठा धक्का! बड्या नेत्याचा राजीनामा 🚨

Rokhthok Maharashtra 18 0

नाशिकच्या भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणामुळे राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर आता एका बड्या पदावरील व्यक्तीला राजीनामा द्यावा लागला आहे.
समता पतसंस्थेचे संस्थापक काका कोयटे यांनी राज्य पतसंस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. खरात याचे समता पतसंस्थेशी संबंध असल्याची माहिती समोर आल्यानंतर सभासदांकडून दबाव वाढत होता.
दरम्यान, अशोक खरात तब्बल 100 खात्यांचा नॉमिनी असल्याचं समोर आलं असून, या खात्यांमधून कोट्यवधींचे व्यवहार झाल्याची चर्चा आहे.
मात्र काका कोयटे यांनी सर्व आरोप फेटाळत, “मी खरातचा भक्त नाही,” असं स्पष्ट केलं आहे. संबंधित खात्यांची केवायसी प्रक्रिया पूर्ण करूनच ती उघडण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं.
दरम्यान, या प्रकरणाची चौकशी सुरू असून, पुढे आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.